सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठीच कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र उद्या शनिवार दि. 29 मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीतीमध्ये 45 वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देय्य असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित संस्थांना पाठविण्यात आलेली असून त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील दुसरा डोस देय्य असलेल्या नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी केले आहे.
या लसीकरण सत्रासाठी लसीकरण केंद्रांवर पुढील प्रमाणे लस उपलब्ध असणार आहे. वैभववाडी तालुक्यात ग्रामिण रुग्णालय, वैभववाडी – 100, कणकवली तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, कणकवली – 150, मालवण तालुक्यात ग्रामिण रुग्णालय, मालवण – 150, कुडाळ तालुक्यात ग्रामिण रुग्णालय, कुडाळ – 150, जिल्हा रुग्णालय, ओरोस – 100, वेंगुर्ला तालुक्यात ग्रामिण रुग्णालय वेंगुर्ला -100, उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा – 100, सावंतवाडी तालुक्यात सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सावरवाड उपकेंद्र – 100, निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तळवडे उपकेंद्र – 100, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र – 100, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र – 100, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी – 150, दोडामार्ग तालुक्यात भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोनाळकट्टा उपकेंद्र – 150, केर उपकेंद्र – 100, खोक्रल उपकेंद्र – 160 आणि ग्रामिण रुग्णालय, दोडामार्ग – 100 अशा एकूण 1 हजार 910 लसी उपलब्ध असणार आहेत.