You are currently viewing जिल्ह्याच्या मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक संपन्न

जिल्ह्याच्या मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक संपन्न

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सजगतेच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी

विविध विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा. प्रत्येक विभागाकडे असणारी साधनसामग्री सुस्थितीत ठेऊन, ती सज्ज ठेवावी. विशेषतः आरोग्य विभागाने आवश्यक त्या औषधसाठ्यांसोबत पॉवर बॅकअप ठेवावा अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे आज घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सहायक जिल्हाधिकारी संजिता महापात्रा, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, दक्षिण कोकण पाटबंधारे महामंडळाचे अधिक्षक अभियंता विजयकुमार थोरात, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, सिंधुदुर्ग प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी.व्ही.अजगावकर, मध्यम प्रकल्प विभागीय पथक अंबडपालचे कार्यकारी अभियंता हर्षल यादव, नगर प्रशासन अधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी विविध विभागांकडून आढावा घेतला. त्या म्हणाल्या, तौक्ते वादळाच्या अनुषंगाने आपणासर्वांची तयारी झाली असली तरी, त्यामध्ये सतर्कता हवीच.

पाटबंधारे विभागाने तिलारी प्रकल्पातील पाण्याबाबत सनियंत्रण करावे. पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी त्याबाबतची पूर्वसूचना देण्याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बंद झाल्यास तो तात्काळ पूर्ववत करण्यासाठी साधनसामग्री तैनात ठेवावी. सर्वच विभागांकडे असणारी साधनसामग्री ही तयार असावी. त्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने कोविड बरोबरच लेप्टो तसेच सर्पदंश यासारख्या घटनांबाबत आवश्यक तो औषधसाठा ठेवावा.

त्याचबरोबर आरोग्य विभागाने पॉवर बॅकअप ही ठेवायला हवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा