You are currently viewing पारिजात

पारिजात

ओघळलेला पारिजात,
पडतो पानांच्या प्रेमात.
झाडावरून गळूनही,
अडकून बसतो पानात.

जपत असावा तोही,
आपलेपणा मनात.
उगाचच का अडकतो,
झाडावर उन्हातान्हात.

परिजाताची पानेही,
असतात थोडी खरखरीत.
नको असते प्राजक्ताला
गादी मऊ लुसलुशीत.

कधीतरी येते हळूच,
झुळूक मंद वाऱ्याची.
मोत्यासारखी सांडते,
रास नाजूक फुलांची.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा