You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न ऐरणीवर

दोडामार्ग तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न ऐरणीवर

उपोषणानंतर मंजुरी मिळूनही निधीबाबत अजून कोणतीही हालचाल नाही

लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज: ग्रामस्थांची मागणी

दोडामार्ग :-

एका विशेष बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील क्रीडासंकुलासाठी भरीव निधीची तरतूद केल्याची घोषणा केली. यामुळे दोडामार्ग तालुक्याला ही आपल्या क्रीडा संकुलासाठी भरीव निधी मिळेल व याचे काम मार्गी लागेल अशी आशादायक स्थिती होती. मात्र तालुक्यातील क्रीडा संकुलावर कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील क्रीडा संकुल कधी सुरू होते यावर मात्र अद्यापही ग्रामस्थ साशंक आहेत.
या क्रीडासंकुलासाठी ग्रामपंचायत सदस्य यांनी उपोषण सुद्धा केले होते.

तदनंतर येथे तात्काळ मंजूरी मिळून काम सुरू होईल, असे शासनाकडून सांगण्यात आलं होतं, मात्र संबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रस्ताव अजूनही धूळखात पडत असून या ठिकाणी मात्र जागा संपादित केल्यानंतर बांधकाम वेगाने होणे गरजेचे असताना हे काम आता तरी थांबलेलेच दिसत आहे. यावर ग्रामस्थ नाराज असून लवकरात लवकर हे काम मार्गी लागावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. साटेली भेडशी येथील उद्योजक व युवा नेतृत्व सिद्धेश पांगम यांनी हे क्रीडा संकुल लवकरात लवकर व्हावे अशी आशा व्यक्त केली असून त्यासाठी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा