चेहऱ्यावर सदोदित विलोभनीय भाव, भेटणाऱ्या प्रत्येकाशी आपुलकीचे वागणे, कार्यकर्त्यांना सन्मान आणि विश्वास देणारी मनोवृत्ती अशा अनेक गुणवैशिष्ठ्यांमुळे महाराष्ट्रभर अत्यंत लोकप्रियता लाभलेले नेते स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा आज जन्मदिन. पण दुर्दैवाने त्यांना आज शुभेच्छा देण्याऐवजी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करावे लागत आहे. साहेब जाऊन आठ वर्षे झाली, तरीही कधीकधी ते आपल्यात असल्याचा भास होतो. साहेबांचं जाण्याचं वय नव्हतं पण साहेब गेले. अगदी अचानक, सगळ्यांना चटका लाऊन.
विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाची पोकळी महाराष्ट्राला आजही अत्यंत तीव्रतेने जाणवत आहे. विकासाची दूरदृष्टी, सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण आणि विलक्षण संघटन कौशल्य असलेला कणखर नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विकासाचे नवे पर्व निर्माण करेल असा लोकांना विश्वास होता. आपल्या कार्यकर्तृत्वाने विलासराव देशमुख या व्यक्तिमत्वाने जनतेच्या मनात घर केले होते.
साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..🙏