मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नेते संदेश पारकर यांची मागणी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नुकसानीबाबत अहवाल केला सादर
सिंधुदुर्गमधे तौक्ते वादळामुळे जिल्ह्यात खुप मोठी हानी झाली होती. त्यांनतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमधे येऊन पाहणी दौरा केला होता. या दौऱयावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांना तौक्ते वादळ नुकसानीबाबत अहवाल तयार करुन पाठवण्याचे आदेश श्री.पारकर यांना सांगितले होते.
त्यानंतर श्री.पारकर यांनी पुर्ण जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा इत्यंभूत आढावा घेऊन अहवाल तयार केला होता. आज तो अहवाल शिवसेना सचिव तथा मुख्यमंत्री महोदयांचे स्विय सहाय्यक श्री.मिलिंद नार्वेकर यांचेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करुन जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे. तसेच निसर्ग वादळ नुकसानीवेळी जे निकष शासनाने लावले होते तेच निकष लावण्याची विनंती श्री.पारकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोकण आणि शिवसेना यांची खुप घट्ट नाळ जोडलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांचे देखील कोकणवर विशेषतः सिंधुदुर्गवर प्रेम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय निश्चितच सिंधुदुर्गला जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देतील असा ठाम विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.