कुडाळ एसटी स्टँड चे काम अर्धवट अवस्थेत टाकल्यामुळे, सिंधुदुर्ग, मध्ये येणाऱ्या प्रवाशी वर्गाचे तसेच गावागावातून येणाऱ्या जनतेचे हाल होत आहेत .
पावसाळा जवळ येत असून एसटी स्टँडच्या इमारतीसमोर चे काम अर्धवट अवस्थेत आहे, शेड व डांबरीकरणा चे काम न सुरू झाल्यामुळे आणि पावसाचे दिवस जवळ आल्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण परिसराची दुर्दशा होणारी आहे
वारंवार पाठपुरावा करून सुद्धा अजून पर्यंत फक्त आश्वासन दिली गेलेली आहेत. 15 दिवसाच्या आत जर का शेड चे काम एसटी महामंडळाने नाही केले तर सदर शेड चे काम महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना आपल्या स्वखर्चाने करून लोकांना या समस्या पासून वाचवण्याचा प्रयत्न करणार, तसेच संपूर्ण कुडाळ एसटी स्टँड च्या आवारात महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना मार्फत निषेधाचे फलक लावून महामंडळाचे निषेध करणार आहे असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.