माजी आमदार शिवराम दळवी यांचा सार्वजनिक बांधकाम ला इशारा
सावंतवाडी :
आंबोली घाट रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते तात्काळ भरावे अन्यथा पालकमंत्री व, जिल्हाधिकाऱ्यांचे सार्वजनिक बांधकामच्या गलथान कारभाराबाबत लक्ष्य वेधले जाईल असा इशारा माजी आ.शिवराम दळवी यानी दिला आहे.
आंबोली घाट रस्ता पुवीँचावस पासुन दोन किलोमीटर धोकादायक होत आहे. याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नाही. कोणतेही मजुर कामाला दिसत नाही. पावसाळ्यात पाणी रस्ता वरून जात आहे. तरी या विभागातील अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. धोकादायक दरीच्या ठिकाणी सर्व संरक्षण भिंती कोसळले आहेत.जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण?
शाखा अभियंता कडे आंबोली विभागात दिला असताना त्या अधिकारी याकडे कानाडोळा अरत आहेत.
आंबोलीघाटातून आता अवजड वाहतूक सुरु असून पुन्हा हाट रस्ता अपघाताला निमंत्रण ठरणारे आहे. घाटरस्ता च्या दोन्ही बाजूला डागडुजी नसल्याने धोकादायक क्षेत्र बनले आहे.दरड कोसळलेली रस्त्यावर माती अजुनपर्यंत तशीच आहे. मोऱ्यात दगड पडुन पाणी रस्त्यावर वाहत आहे.
याकडेही मुख्य अभियंता यांनी लक्ष केंद्रित करून रस्ता दुरूस्ती करावा अशी मागणी शिवराम दळवी यानी केली आहे.