You are currently viewing भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांनी पालकमंत्री यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब

भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांनी पालकमंत्री यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब

सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची केलेल्या घोषणेची 11 दिवस होऊनही अंमलबजावणी नाही

ती घोषणा म्हणजे नवलराज काळे यांच्या कार्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने केलेला डाव – भाजपा युवा मोर्चा वैभववाडी तालुका उपाध्यक्ष लवु पवार यांचा आरोप

वैभववाडी

वैभववाडी तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांनी पालकमंत्री यांच्या बद्दल केलेलं वक्तव्य खरे ठरत आहे. पालकमंत्री यांच्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकमंत्री घोषणांवर घोषणा करतात पण त्यांची अंमलबजावणी होत नाही असे वक्तव्य तालुका सरचिटणीस नवलराज काळे यांनी केले होती. त्याची प्रचिती वैभववाडी तालुक्यातील आढावा बैठकीत दिसून आली. 14 मे 2021 वैभववाडी तालुका आढावा बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी प्रा आ केंद्र सडूरे येथे रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती व ही घोषणा अकरा दिवस होऊन गेले तरी अद्याप प्रत्यक्षात उतरली नाही. या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही त्यामुळे पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नाही हे काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या बातमीत केलेल्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब होत आहे.
किमान घोषणा करून आठ दिवसात रुग्णवाहिका येणे अपेक्षित होते परंतु ती काही अद्याप सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेली नाही असे का…?
पालकमंत्र्यांच्या घोषणेची जर लवकर अंमलबजावणी होत नाही तर जनतेने कोणाकडे पाहायचं असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची केलेली पालकमंत्र्यांची ही घोषणा निवळ शिवसेनेने नवलराज काळे यांनी केलेल्या कार्याचे श्रेय घेण्यासाठी केली असल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष लवु पवार यांनी केला.
ही रुग्णवाहिका मिळावी म्हणून पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने भाजपचे युवा नेतृत्व नवलराज काळे यांनी प्रशासनाकडे 3 मे 2021 पासून मागणी केली होती व ते आज पर्यंत पाठपुरावा करीत आहेत. काळे यांना आरोग्य प्रशासनाने लेखी स्वरूपात जिल्हा परिषद मधून रुग्णवाहिका देण्याचे सांगितले आहे. ही रुग्णवाहिका मिळाल्यानंतर भाजपच्या नवलराज काळे ना श्रेय मिळेल व लोरे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आपण निष्क्रिय आहोत हे जनतेला कळेल या भीतीने शिवसेना नेते भयभीत झाले होते. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्ष लोरे जिल्हा परिषद मतदारसंघा सहित सडूरे शिराळे पंचक्रोशीतील जनतेकडे शिवसेनेने पूर्ण पाठ फिरवली आहे. शिवसेनेने फक्त मतदारसंघातील जनतेच्या मतांचा उपयोग करून घेतला मात्र विधायक कामे बाजूलाच राहिली आहेत.त्यातून सैरभैर झालेले शिवसेना नेते कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वरती ही टीका करीत आहेत. पहिला जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सत्ता असून आपण काय केले याचे शिवसेनेने आत्मपरिक्षण करावे मग आमदार नितेश राणे साहेबांवर ती टीका करावी. शिवसेनेने सत्ता असलेल्या लोरे जिल्हा परिषद मतदार संघातील सडूरे शिराळे सहीत इतर खोरीतील गावांना काय दिले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती काय उपाययोजना केल्या हे जनतेसमोर मांडावे. मतदार संघातील शिराळे नावळे कुर्ली या तीन गावांना मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे याकडे शिवसेनेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या गोष्टीकडे शिवसेनेने लक्ष देऊन कामे करावीत. कोरोना काळात गेले दीड वर्ष नवलराज काळे यांचे सहीत भाजपचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते पंचक्रोशीतील अतिदुर्गम भागात जनतेला सेवा पुरवण्याचे काम करीत आहेत. सडूरे,अरुळे शिराळे,सांगुळवाडी,कुर्ली,नावळे गावांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे येथे चालू करण्यासाठी नवलराज काळे यांनी अथक प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
08 मे 2021 रोजी नवलराज काळे यांच्या पत्रकार परिषदे मधील पालकमंत्री बाबत व राज्य सरकार बाबत मांडले मुद्दे खोडून टाकण्यासाठी शिवसेना नेत्यांना अचानक जाग आली. पण ती जाग मांडलेले मुद्दे सोडवण्यासाठी जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी आली असती तर आमच्या सहीत जनतेला देखील समाधान वाटले असते पण तसे न होता ही जाग निवळ श्रेय घेण्यासाठी आली असल्याचे स्पष्ट दिसून येते. शिवसेनेने जनतेला काम दाखवे. पहिले जनतेची कामे करा मगच श्रेय घ्या. नुसती श्रेय घेण्यासाठी घोषणाबाजी करणे,मी काहीतरी करतो आहे असे देखावे करू नयेत असा टोला लगावत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वैभववाडी तालुका उपाध्यक्ष लवु पवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

प्रतिक्रिया व्यक्त करा