You are currently viewing सिंधुदुर्गातील पत्रकारांसाठी एक राखीव व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करावा…

सिंधुदुर्गातील पत्रकारांसाठी एक राखीव व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करावा…

पत्रकार परिषद घेणे लोकप्रतिनिधींनी टाळावे…
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठेंचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन..

सिंधुदुर्ग :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात पत्रकारांसाठी एक राखीव व्हेंटिलेटर बेड ठेवण्यात यावा अशी मागणी आपण जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी आज येथे दिली.

दरम्यान या कठीण काळात पत्रकारांनी आपल्यासह कुटुंबीयांची काळजी घ्यावी तसेच आणखी महिनाभर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा पत्रकार परिषद घेणे टाळून झूम ॲप किंवा प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून आपले विचार मांडावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. याबाबत त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.ते पुढे म्हणाले राज्यासह जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे राज्यात या आजारामुळे काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर जिल्ह्यात सुद्धा दोघा पत्रकारांसह एका पत्रकाराच्या कुटुंबियांना कारोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पत्रकारांनी स्वतःसह कुटुंबीयांची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. आणखी महिनाभर पत्रकार परिषदघेणे टाळावे.

याबाबत आपण पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी झूम अॅप द्वारे किंवा प्रसिद्धिपत्रकाद्वारे आपले विचार मांडावेत अशी मागणी केली आहे. यामुळे पत्रकारांनी खबरदारी घेऊन यापुढील काळात आपली कामगिरी योग्य रीतीने पार पाडायची आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांना केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा