You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील उघड्या चिरेखाणी धोकादायक

दोडामार्ग तालुक्यातील उघड्या चिरेखाणी धोकादायक

महसूल विभाग केव्हा घेणार दखल की आणखी कुणाचे जीव जाण्याची बघत आहे वाट..

दोडामार्ग :

दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या चिरे खाणी या बुजवण्याचे आदेश असताना देखील अनेक चिरेखाणी या उघड्या ठेवल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात यात पाणी साचून अपघाताच्या घटना घडत असतात. मागील वर्षी वझरे कोळगिरे येथील अश्याच उघड्या चिरेखाणीत साचलेल्या पाण्यात पडून दोन शाळकरी मुलांचा दूदैवी मृत्यू झाला. या नंतर तरी महसूल प्रशासन यंत्रणा जागी होईल, असे वाटत होते.

पण पावसाळा तोंडावर आला तरी दोडामार्ग तालुक्यातील माटणे आयी परिसरात उघड्या धोकादायक चिरे खाणी आजही जैसे थे आहेत. त्या न बुजवता पुन्हा गौण खनिज उत्खनन केले जात आहे. शिवाय यात काही चिरेखाणी यांना रितसर परवानगी देखील नाही. तेव्हा महसूल विभाग केव्हा दखल घेणार की आणखी कुणाचे बळी जाण्याची वाट बघत आहात असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा