You are currently viewing प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी आपद्ग्रस्तांना दिला दिलासा…

प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी आपद्ग्रस्तांना दिला दिलासा…

सिंधुदुर्गात नुकसानग्रस्त भागाची पाहणी..

देवगड :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर केला. रत्नागिरी जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत यांनी देवगड येथील आनंद वाडी बंदराला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नुकसानग्रस्तांना अहवाल प्राप्त होताच तात्काळ नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई प्रवास करत गुजरात येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि तात्काळ १ हजार कोटीचा निधी फक्त गुजरातला जाईल केला. खरं म्हणजे पंतप्रधान देशाचे असताना फक्त गुजरातला त्यांनी मदतीचा हात दिला. याकडेही नाना पटोले साहेब यांनी लक्ष वेधले.

 

नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यावर सायंकाळी उशिरा ते आचरा येथे पोहोचले तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नानासाहेब पटोले यांच्यासोबत आमदार माणिकराव जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे, जिल्हा काँग्रेसचे नेते विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष साईनाथ चव्हाण, देवगड ‌तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या निवासस्थानी प्रतीक्षा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी स्नेहभोजन घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा