देवगड
आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने देवगड तालुक्यातील मोडपार गावांतील मोंडेवाडी येथील अशोक सिताराम मोंडे यांच्या निवासस्थानी जाऊन जम्बो ऑक्सिजनची सुविधा पुरविण्यात आली. डॉ. अमोल तेली व मोंड आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप तावडे यांनी प्राथमिक तपासणी करून त्यानंतर श्री. मोंडे यांना ऑक्सीजनची सेवा यशस्वीरीत्या चालू करून देण्यात आली.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिरजे, किसान मोर्चा अध्यक्ष भूषण बोडस, पडेल विभागीय अध्यक्ष संदीप तावडे, व श्री मोंडे यांचे चिरंजीव अमित मुंडे हे देखील उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांच्या या भरीव कामामुळे मोंडे कुटुंबीयांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.