मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर व मनोज चव्हाण यांनी केला मोफत पाणी पुरवठा
मनसेच्या उपक्रमांचे ग्रामस्थांनी केले कौतुक
तौक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मालवण तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबंदा येथील ग्रामस्थांच्या मदतीला मनसे धावली आहे.मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर, मातोश्री सेवाग्राम ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण(मनसे सरचिटणीस) यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर मनसेचे नेते तसेच स्थानिक पदाधिकारी नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी लक्ष ठेवून आहेत.
नैसर्गिक आपत्ती नंतर मालवणात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.मालवणातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
चक्रीवादळानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा दिला होता.वीज पुरवठा अजुन ५ ते ६ येणार नसल्याचे लक्षात येताच परशुराम उपरकर यांनी विनोद सांडव,अमित इब्रामपूरकर यांना तातडीने लक्ष देण्याची सुचना केली होती.त्यानुसार बंद असलेले मोबाईल सुरू करण्यासाठी परशुराम उपरकर यांनी जनरेटर उपलब्ध करून दिला आहे.याचा लाभ देवबागवासीय ग्रामस्थ यांना होत आहे.
सर्जेकोट-मिर्याबांदा येथेही आज मनसेच्यावतीने मनविसे विभाग अध्यक्ष सर्जेकोट जनार्दन आजगांवकर,शाखा अध्यक्ष सर्जेकोट वैभव आजगांवकर,मनविसे उपविभाग अध्यक्ष दर्शन सावजी,मनविसे शाखा अध्यक्ष वैभव करवडकर,वृषभ आजगावंकर,प्रतिक कुबल,बजरंग कुबल,अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा केला जात आहे.
कोणतेही सत्ताकेंद्र नसताना राज ठाकरेंच्या मनसे पक्षाने चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर इतर राजकीय पक्ष्यांवर टीका टिप्पणी न करता करत असलेल्या जनतेची कोरोना आणि चक्रीवादळ या दुहेरी संकटातुन मुक्तता व्हावी पुन्हा जनजीवन पुर्वपदावर यावं यासाठीच्या प्रयत्नांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
मनसेच्या या उपक्रमाबाबत अनेक ग्रामस्थांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद देत अशाप्रकारे तुम्ही काम सुरु ठेवा मनसेचं भविष्य उज्वल असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिले आहेत.