You are currently viewing पोलिसांनी वेंगुर्लेत भाजपा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांना नोटिसा बजावल्या – पण मालवणला जनतेने वडेट्टीवारांचा ताफा अडवलाच !!

पोलिसांनी वेंगुर्लेत भाजपा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांना नोटिसा बजावल्या – पण मालवणला जनतेने वडेट्टीवारांचा ताफा अडवलाच !!

जनतेच्या मनातील संतापाच्या भावना भाजपाने व्यक्त केल्या होत्या हेच अखेर सिद्ध झालं…!! :भाजपा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांचा दावा

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना सिंधुदुर्गात फिरू देणार नाही असा इशारा सोशल मीडियावर दिल्याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी भाजपा सरचिटणीस श्री प्रसन्ना देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल दाखल करण्याची नोटीस बजावली होती. मंत्री विजय वडेट्टीवार यांचा हा शासकीय दौरा आहे. त्यामुळे या दौ-याच्या अनुषंगाने आपल्याकडून कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याजोगा प्रकार घडल्यास आपल्यावर गुन्हा नोंद होईल, अशी ही नोटीस होती.

परंतु मालवण तालुक्यात देवबाग येथे ग्रामस्थांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या गाडीचा ताफा पोलीस सिक्युरिटीमध्येही अडवून दाखवला. प्रसन्ना देसाई आणि भाजपाने व्यक्त केलेल्या भावना जनतेच्या मनातल्या होत्या, हेच सिद्ध झालं. स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षकांना उतरून मंत्र्यांना मार्गी लावण्याची वेळ आली. राज्याचे मुख्यमंत्री ज्या मालवणचा दौरा करतात त्याच मालवणला त्यांच्याच सरकारच्या मंत्र्यांना जनता अडवते, निषेध करते, याचा अर्थ सरळ आणि साधा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फसव्या दौऱ्यावरचा हा जनतेचा राग आहे. सरकारने यापुढे जे करायचे आहे ते तातडीने करून दाखवावे. तुमच्या फसव्या पॅकेजच्या बुडबुड्याना जनता आता भुलणार नाही. शिवसेनेची कोकणातली उखडत चाललेली मुळे अशा लिपस्टिक दौऱ्याने मजबूत होतील या भ्रमाच्या भोपळ्याला फोडायला जनता आता उत्सुक आहे. पंढरपूरला विठ्ठलाने दाखवलेला यांच्या पराभवाचा मार्ग यापुढे राज्यभर चोखाळला जाईल. कोविडच्या पदराखाली लपून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून सत्तेवर मांड ठेवण्याचा प्रयास कधीच यशस्वी होणार नाही. भाजपा जनतेच्या मनातल्या भावना मांडतो आणि बेधडक मांडतच राहणार. शेवटी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत कितीही नोटिसा भाजपा पदाधिकाऱ्यांना बजावल्या तरीही अंतिम विजय सत्याचाच होतो, विजय वडेट्टीवारांचा नाही हेच देवबागच्या घटनेने सिद्ध झाले आहे. पोलीस यंत्रणेनेही सरकारच्या हातचे बाहुले न होता सद्सद्विवेक बुद्धीने काम करावे असाही सल्ला अविनाश पराडकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा