कुडाळ :
तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील घरे, शेती, वीजेचे खांब, शासकीय इमारती यांच मोठे नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने आमदार श्री. वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने शिवसेनेच्या वतीने ज्यांचे पत्रे तुटून नुकसान झालेले आहे अशा नागरिकांना घावनळे मतदार संघ घावनळे विभागात नुकसान धारकांना विनामूल्य सिमेंट पत्रे घरपोच वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना कुडाळ चे उपतालुका प्रमुख श्री. कृष्णा धुरी, ग्रामपंचायत सदस्या सौ. आरती वारंग, उपविभाग प्रमुख पप्पू म्हाडेश्वर, शाखा प्रमुख दिपक सावंत, शाखा प्रमुख भाई भिंगारे, तसेच शिवसेना कार्यकर्ते जनार्दन काष्टे, दादा मेस्त्री, बाळा सावंत, एस. टी. सावंत सर, आबा टिळवे, दशावतारी कलाकार रवी सावंत आदी उपस्थित होते.