सिंधुदूर्ग :
तोक्ते चक्रीवादळामध्ये सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात अपरिमित हानी झाली. काल काही भागात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे बनविल्या नंतर त्याचा अहवाल दोन दिवसात सादर होईल. त्यानंतर निश्चितपणे आपद्ग्रस्तांना नुकसानभरपाई दिली जाणार. असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आज टीका करण्यापेक्षा संकटाला सामोरे जाऊन जनजीवन पूर्ववत कसं होईल याला प्राधान्य द्यायला हवं. असे ते विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले.