– रामदास आठवले
चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकार देईल पण महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी न झटकता केंद्राकडे बोट न दाखवत निसंकोचपणे नुकसानग्रस्तांना भरघोस अशी मदत करावी असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा केला या दौऱ्यामध्ये अनेक भागांची त्यांनी पाहणी केली त्यानंतर कुडाळ येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम, रमाकांत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की शेतकऱ्यांना हेक्टरी 10000 एवढी मदत मिळणे अपेक्षित आहे तसेच ज्यांची घरे मंगळ गोठे यांचे झालेले नुकसान मच्छीमारांचे झालेले नुकसान सरकारने दिले पाहिजे असे त्यांनी सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात ज्याप्रमाणे पॅकेज दिले त्याप्रमाणे महाराष्ट्र ला सुद्धा पॅकेज द्यावे कारण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात या वादळाने मोठे नुकसान केले आहे महाराष्ट्रातील नुकसानीबाबत केलेल्या त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी पत्र लिहून मोठे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारने केंद्र सरकार कडे मदतीसाठी बोट न दाखवता आपल्या स्तरावर नुकसानग्रस्तांना मदत करावी असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.