You are currently viewing कोलगाव ग्रा.प.च्या कर्मचाऱ्यांनी राजकीय दहशतीला घाबरू नये : मायकल डिसोझा

कोलगाव ग्रा.प.च्या कर्मचाऱ्यांनी राजकीय दहशतीला घाबरू नये : मायकल डिसोझा

सावंतवाडी

कोलगाव गावातील सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांनी राजकीय दहशतीला घाबरून न जाता बदली किंवा स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबिरपणे उभी राहणार असल्याच मत जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मायकल डिसोजा यांनी व्यक्त केल आहे. कोरोना महामारीत सर्वसामान्य गरीब लोकांची चांगल्या प्रकारे सेवा केल्याबद्दल सांगली आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद, पहिल्या व दुसऱ्या लाटेत सुद्धा चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करून ही लाट आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, कोलगाव मध्ये व सांगली मध्ये लसीकरण झालं. या लसीकरण मोहिमेमध्ये लस फुकट न घालवता योग्य प्रकारे वापर करून जास्तीत जास्त लोकांना लसीकरणाचा फायदा करून दिला. लसीकरणाबाबत म्हणायचं झालं तर आमच्या सांगेली आरोग्य केंद्राने केरळ पॅटर्न राबवण्यात आला, असे छान प्रकारे लसीकरणाचे काम चालू असताना काही स्वयंघोषित राजकीय पुढारी कर्मचार्‍यांना त्रास देण्याचे काम करत आहेत. आज कोलगाव मध्ये बघायला गेलात तर शहराच्या जवळ असून सुद्धा दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी कर्मचारी जिवाचे रान करत आहेत, यात सर्वात महत्त्वाचा व मोलाचा वाटा हा सर्व आरोग्य कर्मचारी व सर्व शासकीय कर्मचारी यांचा आहे. असे असून सुद्धा काही विघ्नसंतोषी लोक शासकीय कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचे काम काम करत आहेत हे कुठल्याही प्रकारे खपवून घेतला जाणार नाही, शासन व प्रशासन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे प्रत्येकाने योग्य तो सन्मान राखून आपापल्या परीने काम केले पाहिजे पण असे होताना दिसत नाही. कोलगाव गावाचे सांगायला गेलं तर पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती होती तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवते की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाच वर्षापूर्वी गावांमध्ये कुठल्याही अधिकारी यायला तयार नव्हता पण नंतर शिवसेनेची ग्रामपंचायत आल्यानंतर जिल्ह्यातील चांगले अधिकारी आणि कर्मचारी आमच्या गावात दाखल झाले. त्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळू लागली परंतू आजची परिस्थिती पाहिली असता गावात ग्रामसेवक सुट्टीवर गेले, ग्रामपंचायत कर्मचारी राजीनामा दिला, चांगले शिक्षक गावात यायला तयार नाहीत, कोलगावतील वारमन ला दमदाटी करण्यात येते. ही जर हुकूमशाही अशीच चालू राहिली तर भविष्यात कठीण परिस्थिती गावांमध्ये निर्माण होईल. आपल्या कोलगाव विकासाच्या व शहरीकरण्याच्या मार्गावर आहे आणि कोलगावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे पण जर अशी दादागिरी व हुकूमशाही अशीच गावात सुरू राहिली तर मात्र याचे दूरगामी दुष्परिणाम गावाच्या विकासावर होतील हे मात्र निश्चित. गावात दहशत निर्माण करणाऱ्या मी एकच सांगू इच्छितो ही तुमची दादागिरी जास्त दिवस चालणार नाही ही लोकशाही आहे आणि तुम्ही जर तुमची वागणूक सुधारले नाही आम्हाला सुद्धा स्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेसमोर तुमच्या अन्यायाचा पाढा वाचावा लागेल व तुमच्या विरोधात लोकचळवळ उभी करावी लागेल असा इशारा मायकल डिसोजा यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा