You are currently viewing सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे यांनी दिला आपदग्रस्तांना दिलासा

सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे यांनी दिला आपदग्रस्तांना दिलासा

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे व जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांनी सागरेश्वर, नवाबाग,वेंगुर्ला शहर तसेच इतर नुकसानग्रस्त भागाचा पाहणी केली. नुकसानग्रस्ताना जास्तीतजास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे यांची भेट घेऊन तालुक्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. या पहाणी दौ-यात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, तालुका अध्यक्ष विधाता सावंत,शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, उभादांडा उपसरपंच केळुसकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा