कुडाळ :
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने कुडाळ पंचयात समिती, *सभापती सौ. नूतन आईर यांनी आज सकाळ पासून कुडाळ तालूक्यात नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची तीव्रता जाणून अनुषंगिक उपाययोजना करण्या बाबत संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या..*
तालुक्यातील वेताळ बांबर्डे, डिगस, आवळेगाव, कडावल, भडगाव, कुपवडे, जांभवडे, भरणी, घोडगे आणि सोनवडे या गावांना भेट देत यनुकसान झालेल्या भागाची पाहणी करत एकूण नुकसान भरपाईचा आढावा घेतला. तसेच नुकसान झालेल्या नागरिकांची आस्थेने चौकशी करत नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल अशी ग्वाही देखील दिली.
*यावेळी त्यांच्या समवेत भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, जि.प. सदस्य, लॉरेन्स मान्येकर, प.स.सदस्य बाळकृष्ण मडव, भाजपा सरचिटणीस देवेंद्र सामंत, नारायण गावडे, नित्यानंद कांदळगावकर, प्रफुल्ल सावंत, नागेश आईर, अनिल परब सहाय्यक गट विकास अधिकारी मोहन भोई, कनिष्ठ सहा. संदेश कुंभार, योगेश घाडी, प्रितेश गुरव, विनोद सावंत जयेश चिंचाळकर आदी उपस्थित होते..*
तसेच वेताळ बांबर्डे सरपंच संध्या मेस्त्री, ग्रामसेवक डी.बी.पिंटो, डिगस सरपंच सतीश सुर्वे, ग्रामसेवक श्रीम मयेकर, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, ग्रामसेवक संतोष कविटकर, कडावल सरपंच स्नेहा ठाकूर, ग्रामसेवक स्वप्नजा पेडणेकर, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, उपसरपंच, ग्रामसेवक अनिला घुगरे, भरणी सरपंच प्रिया परब, ग्रामसेवक अमित मार्गी, घोडगे सरपंच अमोल तेली, सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर, ग्रामसेवक गुरुप्रसाद वंजारे आदींनी उपस्थितांना वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.