आठवणीत ठेवलं मी तुला माझ्या,
सवय माझी मलाच जड जात होती.
हृदयात जपायचं कुणी कुणाला किती,
प्रेमाची गणितं मला तरी कुठे ज्ञात होती.
विश्वासाने मुळे मनात खोलवर रुजली,
शेंडा पोखरून किड आतून खात होती.
वादळ होऊन वारा जोशात दौडला,
पावसालाही कुठे दिशा त्याची माहीत होती.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६.