– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
सद्दस्थितीत जिल्हयात कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून सदर रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण लक्षणिय आहे. बऱ्याचवेळा रुग्ण हे सर्दी, ताप, खोकला याकरिता सुरवातीला खाजगी डॉक्टर्स कडून औषधोपचार सुरु करतात. अशा रुग्णांवर औषधोपचार करतेवेळी खाजगी डॉक्टर्स हे आरटीपीसीआस चाचणी करत नाहीत. त्यामुळे सदर रुग्णांचा कोरोना विषाणू प्रादुर्भाव बळावतो. सरतशेवटी सदर रुग्ण त्यांची ऑक्सीजन मर्यादा 40 ते 60 एवढी खाली आल्यानंतर सीसीसी, डीसीएचसी किंवा जिल्हा रुग्णालय येथे दाखल होतात. अशा रुग्णांवर विहीत औषधोपचार न झाल्यामुळे सदर रुग्णांच्या मृत्यूचीच शक्यता अधिक आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व खाजगी डॉक्टर्स यांनी त्यांचेकडे दाखल होणाऱ्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला, ILI, SARI असल्यास अशा रुग्णांची आरटीपीसीआस चाचणी करुन घेणे बंधनकारक असेल. तसेच सदर रुग्णांची यादी व चाचणीचा अहवाल हा संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे दरदिवशी पाठविण्यात यावा असे आदेश के. मंजूलक्ष्मी, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत.