You are currently viewing रासायनिक खताच्या किंमतीत वाढ

रासायनिक खताच्या किंमतीत वाढ

कोरोना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

सावंतवाडी
कोरोनाच्या संकटाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता रासायनिक खताच्या किंमत वाढीचा धक्का बसणार आहे. युरीया वगळता सर्व रासायनिक खताच्या किंमती वाढल्या आहेत. डीएपी १४०० वरुन १९००रुपये, कृषी उदयोगचे १०२५ वरुन १२७५, पोटॅशचा दर ८७५ वरुन१ हजार रुपयाच्यावर गेला आहे. कंपन्यानी खताचे दर ३०० ते ७०० रुपये वाढविले आहेत. सध्या सहकारी सोसायटयांवर काही खते जुन्या दराने तर काही खते नवीन दराने विकली जात आहेत. नवीन स्टाॅक आल्यानंतर सर्व खताच्या किंमती वाढलेल्या असणार आहेत. तौक्ते वादळाने कोरोनाने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी खताच्या किंमत वाढीमुळे अधिकच अडचणीत येणार आहे. त्यामुळे सहाजिकच शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा