सावंतवाडी
केसरी गावचे सुपुत्र, सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत (वय ५३ ) यांचं आज निधन झाल. गेले 10 दिवस ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. व्हेंटीलेटर न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला. सुरेश सावंत हे आरोग्य सेवेत अग्रेसर असायचे. आरोग्याचा लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सलाईन, सापाची इंजेक्शन उपलब्ध नसताना त्यांनी स्वखर्चातून ती उपलब्ध करून दिली. आरोग्य सेवेत त्यांचा मोलाचा वाट असायचा. अशा या सामाजिक कार्यकर्त्याला आरोग्य सुविधांअभावी आपला जीव गमवावा लागलं. प्रसिद्ध व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख होती. केसरी इथ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचा पच्छात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, भाऊ, जावई, वहिनी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्यान आरोग्य क्षेत्रातील दानशूर व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.