आ.केसरकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी तात्काळ सरसकट पंचनामे करा; आ.केसरकर यांनी दिले आदेश
बांदा
आमदार दीपक केसरकर यांनी आज दुपारी बांदा शहर व दशक्रोशीत चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी केसरकर यांनी कृषी व महसूलच्या अधिकाऱ्याना तात्काळ सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला उद्या बुधवारी अतिरिक्त १० कर्मचारी देण्याची आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिलेत.
बांदा शहर व परिसरातील ग्रामीण भागाला रविवारी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये घर, मांगर व बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज दुपारी आमदार केसरकर यांनी बांदा शहर, वाफोली, डिंगणे, गाळेल, नेतर्डे येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी श्री नाईक, तहसीलदार राजाराम म्हात्रे, तलाठी वर्षा नाडकर्णी, कृषी विभागाचे प्रशांत चव्हाण, सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, ग्रामविस्तार अधिकारी डी. एस. अमृतसागर, कृषी सहाय्यक श्रीमती वसकर आदी उपस्थित होते