You are currently viewing आरवली वैद्यकीय केंद्रात कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा निर्णय

आरवली वैद्यकीय केंद्रात कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा निर्णय

वेंगुर्ले
आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र येथे मध्यवर्ती ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्याचा निर्णय शिरोडा येथे झालेल्या पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, व्यापारी व नागरीक यांच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. शिरोड्यासह रेडी, आरवली, सागरतीर्थ याठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर शिरोडा पंचक्रोशीतील काही जागरुक लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरीक यांची तातडीची बैठक शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिरोडा ग्रामपंचायत सभागृहात सोशल डिस्टंनचे पालन करुन घेण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा