You are currently viewing तौत्के चक्रीवादळाचा बागायतीला फटका

तौत्के चक्रीवादळाचा बागायतीला फटका

3 हजार 375 हेक्टर क्षेत्रावरील बागायतीचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी

तौक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या एकूण 3 हजार 375 पूर्णांक 16 हेक्टर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान हे काजू बागायतींचे झाले असल्याची माहिती अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

                बागेनुसार झालेल्या नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. आंबा – 1 हजार 110 पुर्णांक 42 हेक्टर, काजू – 2 हजार 119 पुर्णांक 48 हेक्टर, नारळ – 110 पुर्णांक 58 हेक्टर, सुपारी – 12 पुर्णांक 38 हेक्टर, कोकम – 18 पुर्णांक 40 हेक्टर तर केळी – 3 पुर्णांक 90 हेक्टर क्षेत्र या प्रमाणे नुकसान झाले आहेत. आंब्याच्या 277 पुर्णांक 61 हेक्टर क्षेत्रावर फळगळ झाली असून 832 हेक्टर क्षेत्रावरील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. काजूच्या 1 हजार 801 पुर्णांक 56 हेक्टरवरील झाडांच्यांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तर 317 पुर्णांक 92 हेक्टरवरील झाडे उन्मळून पडली आहेत. नारळाची एकूण 11 पुर्णांक 6 हेक्टर क्षेत्रावरील झाडे मोडली असून 99 पुर्णांक 52 हेक्टर क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली आहेत. सुपारीच्या 12 पुर्णांक 38 हेक्टर क्षेत्रावरील झाडे मोडून पडली आहेत. कोकमच्या 16 पुर्णांक 56 हेक्टरवर फळगळती झाली असून 1 पुर्णांक 84 हेक्टर क्षेत्रावलील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. केळीच्या 3 पुर्णांक 90 हेक्टर क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली आहेत.

                तालुका निहाय बागायतीच्या नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सावंतवाडी तालुक्यात 38 गावांमधील 138 शेतकऱ्यांच्या बागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 40 पुर्णांक 10 हेक्टर, काजू – 323 हेक्टर, नारळ – 12 पुर्णांक 18 हेक्टर, सुपारी – 1 पुर्णांक 19 हेक्टर, कोकम – 1 पुर्णांक 32 हेक्टर, केळी – 1 पुर्णांक 30 हेक्टर असे एकूण 379 पुर्णांक 09 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यात 14 गावांमधील 129 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 11 पुर्णांक 90 हेक्टर, काजू – 521 पुर्णांक 80 हेक्टर, नारळ – 4 पुर्णांक 74 हेक्टर, सुपारी – 2 पुर्णांक 10 हेक्टर, कोकम – 0 पुर्णांक 20 हेक्टर, केळी -1 पुर्णांक 72 हेक्टर असे 541 पुर्णांक 76 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. वेंगुर्ला तालुक्यात 19 गावांमधील 130 शेतकऱ्यांच्या बागेचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 113 पुर्णांक 40 हेक्टर, काजू – 114 पुर्णांक 30 हेक्टर, नारळ – 5 पुर्णांक 20 हेक्टर, सुपारी – 1 पुर्णांक 16 हेक्टर, कोकम – 0 पुर्णांक 20 हेक्टर, केळी – 0 पुर्णांक 20 हेक्टर असे एकूण 234 पुर्णांक 46 हेक्टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यात 24 गावांमधील 148 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 39 पुर्णांक 52 हेक्टर, काजू – 410 पुर्णांक 74 हेक्टर, नारळ – 11 पुर्णांक 38 हेक्टर, सुपारी – 1 पुर्णांक 14 हेक्टर, कोकम – 1 पुर्णांक 38 हेक्टर, केळी – 0 पुर्णांक 18 हेक्टर असे एकूण 464 पुर्णांक 34 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आहे. देवगड तालुक्यात आंबा – 765 पुर्णांक 42 हेक्टर, काजू – 44 पुर्णांक 60 हेक्टर, नारळ – 9 पुर्णांक 32 हेक्टर, सुपारी – 0 पुर्णांक 16 हेक्टर, कोकम – 0 पुर्णांक 10 हेक्टर व केळी – 0 पुर्णांक 10 हेक्टर मिळून 819 पुर्णांक 70 हेक्टर क्षेत्र असे एकूण 19 गावातील 119 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यात 27 गावामधील 147 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले असून आंबा – 114 पुर्णांक 48 हेक्टर, काजू – 545 पुर्णांक 58 हेक्टर, नारळ – 64 पुर्णांक 60 हेक्टर, सुपारी – 6 पुर्णांक 39 हेक्टर, कोकम – 14 पुर्णांक 90 हेक्टर, केळी – 0 पुर्णांक 40 हेक्टर असे एकूण 746 पुर्णांक 35 हेक्टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तुलुक्यात 13 गावांमधील 129 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 13 पुर्णांक 32 हेक्टर, काजू – 48 पुर्णांक 42, नारळ – 0 पुर्णांक 80, सुपारी – 0 पुर्णांक 06, कोकम – 0 पुर्णांक 12 असे एकूण 62 पुर्णांक 72 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातील 18 गावांमधील 119 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 12 पुर्णांक 28 हेक्टर, काजू – 111 पुर्णांक 74, नारळ – 2 पुर्णांक 36 हेक्टर, सुपारी 0 पुर्णांक 18 हेक्टर, कोकम – 0 पूर्णांक 18 हेक्टर असे एकूण 126 पुर्णांक 74 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आहे.

                जिल्ह्यात सर्वात जास्त बागांचे नुकसान देवगड तालुक्यात झाले असून त्यानंतर मालवण तालुक्यास फटका बसला आहे. तर सर्वात कमी बागांचे नुकसान वैभववाडी तालुक्यात झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे काजू बागांचे झाले असून केळीच्या बागांचे नुकसान सर्वात कमी आहे. मालवण तालुक्यात काजू, नारळ, सुपारी, कोकमच्या बागांना सर्वात जास्त फटका बसला असून आंब्याचे सर्वात जास्त नुकसान हे देवगड तालुक्यात झाले आहे. तर केळीच्या सर्वात जास्त नुकसानीची नोंद दोडामार्ग तालुक्यात झाली आहे.

                सदरची आकडेवारी ही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडून देण्यात आली असून प्राथमिक स्वरुपाची आहे. या आकडेवारीमध्ये बदल होऊन वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा