वाढता अतीव प्रेमतृष्णा
धावत गर्जत येतो झडकरी
पाऊस होऊन सखा श्रीहरी
भेटतो राधेला कृष्ण मुरारी
ग्रीष्म ऋतूत होता काहीली
सांगतो सूर्याला थांब जरा
राधेच्या गळ्यात घालण्या
धाडून देतो जलदांच्या गारा
आषाढाच्या प्रथम दिनी
होऊन जातो सुखद गारवा
केसातील मयुरपंख त्याचा
गातो शृंगारिक राग मारवा
असा कसा खोडील बाई
भेटतो अवचित भर दुपारी
कधी येतो होऊन श्रावण
उन्हात न्हाते राधा बिचारी
कुठे ठावूक आहे जगाला
का बरसतात वळीव सरी
आर्त राधा करता विनवणी
पाऊस रुपी भेटतो श्रीहरी
निर्मिले तयाने जग सारे
जगदीश्र्वरा प्रेमळ दृष्टी
जरी बरसतो राधेसाठी
करतो सृष्टीवर जलवृष्टी
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664