You are currently viewing कुडाळ तालुक्यात तौक्ते चक्रीवादळामुुुळे घरांची पडझड; कोटींचे नुकसान

कुडाळ तालुक्यात तौक्ते चक्रीवादळामुुुळे घरांची पडझड; कोटींचे नुकसान

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे कुडाळ तालुक्याला रविवारी चक्रिवादळासह मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. यात गावोगावी घरे, गोठे, मांगर तसेच सार्वजनिक इमारतींची पडझड होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात सुमारे 301 घरे, 15 सार्वजनिक इमारती, 17 गोठे यांची पडझड झाली, तर 25 रस्त्यांचे असे एकूण तालुक्यात सुमारे 1 कोटी 14 लाख 91 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पंचायत समिती प्रशासनाने पं.स. येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला. या ठिकाणी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, विस्तार अधिकारी आर. डी. जंगले व संजय ओरोसकर यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींशी संपर्क साधून नुकसानीचा आढावा घेतला.

या नुकसानीची नोंद पंचायत समितीमधील आपत्कालीन कक्षात करण्यात आली आहे. तालुक्यात ठिकठिकाणी घरे, मांगर गोठ्यांवर झाडे पडून नुकसान झाले, तर काही ठिकाणी छप्पर उडून नुकसान झाले. यात 301 घरे, 2 ग्रा.पं.इमारती, 3 शाळा इमारती, 4 अंगणवाडी इमारती, 3 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारती, 17 गोठे, समाज मंदिर, पिकअप शेड, पंपशेड, पंचायत समिती इमारत, गोदाम व आयसीडीएस सभागृह अशा 7 इमारती आणि 25 रस्ते यांचे मिळून सुमारे 1 कोटी 14 लाख 91 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा