चक्रीवादळामुळे देवगड किनारपट्टीवर लाटांचे तांडव
देवगड
तालुक्यामध्ये तौऊ ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर लाटांचे तांडव सुरू झाले असून समुद्र खवळल्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद असून तामीळनाडू, केरळ, कर्नाटक या परराज्यातील नौका देवगड सुरक्षित बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.
तौऊ ते चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसेल असा इशारा देण्यात आला होता.या पाश्र्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली होती. समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या सर्व नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या.यामध्ये तामीळनाडू, केरळ, कर्नाटक या परराज्यातील नौकोंचाही समावेश होता. चक्रीवादळामुळे देवगड तालुक्यात सर्वत्र पावसानेही हजेरी लावली.दुपारी गडगडाटासह पावसाने धुमाकुळ घातला मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला.शुक्रवारी वादळी वा-यामुळे विद्युतपुरवठा खंडीत झाला.दरम्यान वा-याचा जोर कमी असल्यामुळे आंबा पिकावर त्याचा परिणाम झाला नाही. मच्छिमारीसाठी गेलेल्या सर्व नौका शुक्रवारी सायंकाळपासून देवगड बंदरात परतू लागल्या.शनिवारी बंदर नौकांनी गजबजले होते.मच्छिमारी व्यवसाय ठप्प होता.सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने ठिकठिकाणी पाणी साचले.मात्र वाèयाचा व पावसाचा जोर कमी असल्याने तालुक्यात पडझड झाल्याची नोंद सायंकाळपर्यंत नव्हती.