You are currently viewing शिरवल कोविड केअर सेंटर मधून  १८५ रुग्णांना डिस्चार्ज

शिरवल कोविड केअर सेंटर मधून १८५ रुग्णांना डिस्चार्ज

कणकवली :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोविड  रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक बेडची आवश्यकता असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी  ताबडतोब विजयराव नाईक फार्मसी कॉलेजची इमारत कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून दिली. १६ एप्रिल रोजी हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. याठिकाणी १०० बेड उपलब्ध ठेवण्यात आले असून या कोविड केअर सेंटरमध्ये आतापर्यंत  २२३ कोविड  रुग्ण दाखल झाले आहे. त्यातील १८५ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या ३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

या कोविड केअर  सेंटरचा अनेकांना फायदा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातून रुग्ण उपचारासाठी  याठिकाणी दाखल होत आहेत. रुग्णांवर  उपचार करण्यासाठी डॉक्टर व नर्स २४ तास याठिकाणी कार्यरत आहेत. कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे स्वतंत्र बेड,रुग्णांना येण्या-जाण्यासाठी तसेच नाष्टा व जेवणाची सुविधा, पाण्याची चांगली सुविधा पुरविली जात आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. रुग्णांना वाफ घेण्यासाठी स्टीमर, गरम पाण्यासाठी किटली, वायफाय सुविधा देण्यात आली आहेत. त्यामुळे कोविड रुग्ण समाधान व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा