त्यांना नव्या आजाराची लागण..
काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच राजीव सातव कोरोनामुक्त झाले होते. परंतु सातव यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज दुपारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जहांगीर रुग्णालयात हजर झाले. तसंच काही स्थानिक नेते रुग्णालयात हजर आहेत.
खासदार राजीव सातव यांनी करोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होतं. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आलं होतं. पण अखेर ते यातून बरे झाले होते. त्यांचा करोना अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देणार अशा चर्चा असतानाच त्यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे.