इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने एकाच वेळेसे टी 20, वनडे आणि कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. वनडे आणि टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. तर टी 20 मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौरकडे आहे.
टीम इंडियाच्या महिला संघाची दौऱ्याची सुरुवात ही कसोटी सामन्याने होणार आहे. उभयसंघात एकमेव कसोटी खेळवण्यात येणार आहे. हा सामना 16-19 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यानंतर 27, 30 आणि 3 जुलैला तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. तर या दौऱ्याची सांगता ही टी 20 मालिकेने होणार आहे. या टी 20 मालिकेतील 3 सामने हे अनुक्रमे 9, 11 आणि 15 जुलैला पार पडतील.
*वनडे आणि टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया*
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त आणि राधा यादव.