ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याची मागणी
सावंतवाडी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला आहे. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राप्त डोसपैकी लसीकरणात आरोग्य केंद्रातील गावांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे आणि नंतरच अन्य तालु्नयातील नागरिकांना लस द्यावी. तसेच ऑनलाईन नोंदणी रद्द करून ऑफलाईन नोंदणी सुरू ठेवावी, अशी मागणी मळेवाड जि.प.सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्या बाहेरील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घेतला. त्यामुळे आरोग्य केंद्रातील सुमारे 20 गावातील शेकडो नागरिक लसीपासून अद्याप वंचित आहेत. 45 वर्षावरील नागरिकांना नियमाप्रमाणे प्राधान्य देऊन कोरोनाचा संसर्ग तोडावा. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीत दिवसेंदिवस अनेक रूग्ण सापडत असल्यामुळे दक्षता म्हणून योग्य ती खबरदारीही घ्यावी आम्हा लोकप्रतिनिधींचे सर्वतोपरी सहकार्य मिळणार असल्याचेही श्री.मुळीक यांनी सांगितले.