You are currently viewing रशियाची स्पूटनिक लस भारतीयांना उपलब्ध…

रशियाची स्पूटनिक लस भारतीयांना उपलब्ध…

जुलैपासून होणार भारतात स्पूटनिक लसची निर्मिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर थैमान घातलेले असताना एक गुड न्यूज आहे. येत्या आठवड्यात रशियाची स्पूटनिक लस भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक व्ही ही भारतातील तिसरी लस असेल. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर जानेवारीपासून केला जात आहे.

जुलैपासून भारतात स्पूटनिक लसची निर्मिती होणार आहे. भारतात स्पूटनिक लशीचे डोस पोचले असून आणि येत्या आठवड्यात नागरिकांसाठी ही लस उपलब्ध होईल.

पुढील आठवड्यापासून नागरिक स्पूटनिक लस घेऊ शकतील. रशियाकडून मर्यादित संख्येत आालेल्या लशींची विक्री केली पुढच्या आठवड्यात सुरू होईल. देशात अधिकाधिक लस उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक पातळीवर काम केले जात आहे. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत लशीची उपलब्धता पाहता एकूण २१६ कोटी डोस मिळण्याची आशा आहे.

यात ५५ कोटी डोस कोव्हॅक्सिनचे, ७५ कोटी डोस कोव्हिशिल्डचे, ३० कोटी डोस बायो इ सब यूनिट लशीचे, ५ कोटी डोस जायडस कॅडिला डीएनचे, २० कोटी डोस नोव्हॅक्सिनचे, १० कोटी डोस डोस भारत बायोटेक नेजल लसीचे, ६ कोटी डोस जिनोवाचे आणि १५ कोटी डोस स्पुटनिकचे असतील. याशिवाय अन्य डोस देखील भारतात दाखल होणार आहे.

१ मे रोजी भारतात स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप आली होती आता या लशींची दुसरी खेप येणार आहे. भारतात रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक व्ही लशींची निर्मिती करणार आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीला केंद्रीय औषध प्रमाणन आणि नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

स्पुटनिक व्ही लशीचे दीड लाख डोस 1 मे 2021 रोजी भारतामध्ये आले आहेत. आता लशीची दुसरी खेप भारतात पोहोचणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा