मीडियाचे स्ट्रिंग ऑपरेशन
कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉक डाऊन सुरू केलं असून पुढेही लॉक डाऊन वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कडक लॉक डाऊन केले असून सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू दूध, भाजीपाला वगैरे घरपोच देण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
लॉक डाऊन मध्ये सर्वसामान्य व्यापारी स्वतःची दुकाने बंद करून घरी बसून सरकारला कोरोनावर मात करण्यासाठी मदत करत असताना सावंतवाडीतील एका राष्ट्रीय पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांच्या दारूची पूजा करणाऱ्या बारमधून बारमधील नोकरांकरावी चोरटी दारू विक्री सुरू आहे. एकीकडे कोरोनावर राजकारण करायचे, रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारायचे, आमदारांवर टीका करायची आणि स्वतःच्या बारमधून चोरटी दारू विक्री करायची अशी दुपट्टी भूमिका सावंतवाडीत त्या पदाधिकाऱ्याकडून केली जात आहे.
संवाद मीडियाने केले स्ट्रिंग ऑपरेशन. दारूची पूजा करणाऱ्या बार मधील लाल रंगाचा शर्ट घातलेला माणूस बाहेर असतो. तळीराम आल्यावर त्यांच्याकडून पैसे घेतो…मग आजूबाजूला नजर फिरवत बारच्या कोपऱ्यात आत जातो…लपवत दारूची बाटली आणतो आणि दुचाकीच्या डिकी मध्ये ठेवतो.
मुख्याधिकारी जावडेकर यांनी दबंगगिरी करत शहरातील एका बार वर कारवाई केली आहे. परंतु शहरातील एका पक्षाचा पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीच्या या बार वर कारवाई का केली नाही, याकडे जागृत नागरिकांनी संवाद मीडियाचे लक्ष वेधले होते. मग सुरू झाले ते संवाद मिडियाकडून स्ट्रिंग ऑपरेशन… आज सकाळपासून दुपारपर्यंत संवाद मीडियाच्या प्रतिनिधीकडून या बारवर बारीक लक्ष ठेवले होते. तळीरामांना या बारमधून कशी सेवा दिली जाते याचे चित्रीकरण संवाद मिडियाकडून करण्यात आले.
संवाद मीडियाने बारमधील त्या नोकराकडे चौकशी केली असता, “रोजच्याच लोकांना देतो, मालकाने सांगितले अनोळखी व्यक्तीला देऊ नको” असे सांगण्यात आले. चोरटी दारू विक्री करत सरकारच्या तिजोरीत टॅक्स जमा करून सदरचा पदाधिकारी सरकारला कोरोनाच्या काळात मदतच करत आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.