लॉकडाउन तर लावलात आता एक्झिट प्लॅन पण तयार करा- प्रतीक कुबल विभाग अध्यक्ष देवबाग
मालवण:
वाढत जाणारे कोरोना रुग्ण आणि त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची दिवसेंदिवस कोलमडत चाललेली आरोग्यव्यवस्था याकडे सत्ताधारी आमदार, खासदार व पालकमंत्र्यांचा दुर्लक्ष होताना साफ दिसतोय आजची परिस्थिती अशी की मुळातच कमी असलेले व्हेंटिलेटर बेड अपुरे पडताना दिसत आहे अशात रुग्णांना कोल्हापूर सारख्या ठिकाणी हलवावे लागत आहे जर आपल्याच जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाले नाही व त्यांचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी प्रशासन व सत्ताधारी आमदार खासदार व पालकमंत्री घेणार का?? फक्त लाईव्ह कॉन्फरन्स घेऊन प्रश्नसुटणार का??
ह्या अश्याच परिस्थितीत आपल्याला जिल्हा किती दिवस ठेवायचा आहे ? पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष असल्यासारखे वागणे जिल्ह्याला अधिक धोकादायक स्थितीत नेईल त्यापेक्षा लसीकरणा मध्ये सुसूत्रता आणून लसीकरण जलद गतीने पूर्ण करावे तसेच कमतरता असणारे व्हेंटिलेटर बेड्स जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावे आणि सारखे सारखे लॉकडाउन वर भर देऊन सामन्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे प्रकार न करता जिल्ह्यासाठी ह्या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी एक व्यवस्थितीत व प्रभावी एक्झिट प्लॅन लवकरात लवकर तयार करावा हि महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे श्री कुबल म्हणाले.