You are currently viewing लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा लॉंग मार्च

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा लॉंग मार्च

जिल्ह्याच्या कडक लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचा ताफा फोंडाघाटमध्ये पोहोचला. त्यांनी एस.टी. स्टँड पासून पोलीस आउट पोस्ट, रेस्ट हाऊस, चेक पोस्ट पर्यंत पायी चालत बाजारपेठ बंद असल्याची पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, फोंडाघाट पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला आणि विशेष पोलीस कमांडो पथक होते.

यावेळी त्यांनी विनाकारण फिरणार्‍यांवर आणि बंद काळात छुपा, अवैध व्यवसाय करून प्रशासकीय सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या स्थानिक दक्षता कमिटीचे सहकार्य हतबल असल्याची बाब यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे निदर्शनास आणून देताना केवळ स्थानिक पोलिस पेठेतील व्यापाऱ्यांवर कारवाई करताना आणि समजावताना दिसतात असे सांगितले. यावेळी त्यांनी स्थानिक दक्षता कमिटीलाही बरोबर घेण्याच्या सूचना केल्या. पोलीस अधीक्षक दाभाडे यांच्या “लॉंग- मार्च” मुळे फोंडा बाजार पेठ व व्यावसायिकांमध्ये भितीयुक्त आदराचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक पोलीस आणि चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांचे मनोधर्य वाढून काम करण्याची उर्जा मिळाल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा