पालकमंत्र्यांनाची घोषणा
जिल्हात सुरू होणार प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धती
आमदार राणे यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे या उपचार पद्धतीसाठी केला होता पाठपुरावा
कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी उपचार पद्धती अवलंबवावी अशी भाजपा आमदार नितेश राणे यांनी सातत्याने केलेली मागणी मंजूर झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लाझ्मा मशीन साठी २५ लाखाचा निधी मंजूर केला असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री सामंत यांना प्लाझ्मा मशीनची जिल्ह्याला असलेली गरज लक्षात आणून दिली होती.तर जिल्हाधिकारी यांना यापूर्वी पत्र देऊन ही उपचार पद्धती जिल्हात राबवावी अशी मागणी केली होती.
दरम्यान आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून पालकमंत्री उदय सावंत यांचे आभार व समाधान व्यक्त केले आहे.
“दोन दिवसा अगोदर सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये .. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी जिल्ह्याला प्लाझ्मा मशीन शासनाकडून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती .. त्याप्रमाणे 25 लाखांच्या निधीची प्लाझ्मा मशीन साठी मान्यता मिळाली याचे समाधान व आभार”
असे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरेपी फारच उपयोगी ठरत आहे.तर जिल्हात कोरोना होऊन बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा डोनेट करण्यास उत्सुक आहेत मात्र ती व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हयात नव्हती.आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आता ही उपचार पद्धती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमलात येणार आहे.