You are currently viewing जयंत जावडेकर यांना मंगेश तळवणेकर यांचा इशारा….

जयंत जावडेकर यांना मंगेश तळवणेकर यांचा इशारा….

सावंतवाडी

नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना किती योगदान देतायत हे त्यांनी जाहीर करावं. शहरातील रूग्णसंख्या वाढायला प्रशासनाचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. आपल्या नाकर्तेपणामुळे शहर धोक्यात आले असून आरोग्य, पाणी प्रश्न गंभीर बनत असताना मुख्याधिकारी मटका स्टॉलवर कारवाई करण्यात आघाडीवर आहेत. रस्त्यावरील कोणालाही मटकावाला समजत विनाकारण नागरिकांना त्रास देत आहेत. रात्री उशीरा या कारवाया करण्यापेक्षा नागरिकांना उपचार मिळत नाही, शहरात बेड नाही, रूग्णसंख्या वाढतेय, पाणी टंचाईकडे लक्ष दिल असतं तर तुम्हाला मानलं असतं. कारवाईत नाही तर कामात देखील मुंडे स्टाईल दिसली असती‌. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी महत्वाची कामं सोडून विनाकारण कारवाया करत फिरू नये.

कोरोना काळातील सेवेला कुरकुर करणारे मुख्याधिकारी रात्री साडेआठला फिरत लोकांवर कारवाया करत आहेत. कोणतेही पुरावे नसताना मुख्याधिकारी हाप्ते गोळा करायला ही तत्परता दाखवत नाही ना ? असा सवाल माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केला आहे. तर मालवणात जे झालं ते सावंतवाडीत करायची वेळ येऊ देऊ नका,कोऱोनामुळे आम्ही शांत आह़ोत याचा गैरफायदा घेऊ नये असा इशारा तळवणेकर यांनी दिला.

तर दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांना नाहक त्रास देण्याच काम मुख्याधिकारी करत असून पोलिस तुमचे नोकर लागतात का? असा सवाल केला. उन्हातान्हात राबणाऱ्या पोलीसांना मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी एसीत बसून.केव्हाही फोन करून मी या स्टॉल वर कारवाई करतो मी त्या स्टॉल वर कारवाई करतो तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या.अशा सूचना करता.

सावंतवाडी शहरातील सायंकाळी काही टू व्हीलर स्वतः पोलीस स्टेशनला घेऊन गेलात, तुम्ही आरटीओ किंवा ट्राफिक पोलीस आहात का?त्यांना दमदाटी दिली म्हणजे तुम्ही कोण आहात तेच आम्हाला समजत नाही. हे सर्व थांबवा. तुम्ही जनतेचे सेवक(नोकर) आहात हे विसरू नका. कोण जर औषधे वगैरे आणण्यासाठी निघाला असताना तो शहरात थांबला तर, त्याच्यावर दारूविक्रीचा संशय घेणे, तातडीने पोलिसांना फोन करणे, तसेच सध्या पावसाळा जवळ आला असून प्रत्येक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे आपापल्या दुकानात सामान व आपली रोजीरोटी चालवण्यासाठी व आपल्या उदरनिर्वाहासाठी जपलेले आपले दुकान दुरुस्ती करण्यासाठी डागडुजी बघत असताना त्याच्यावर कारवाई करणे व पावसामुळे झालेले नुकसान तुम्ही भरून द्याल का?चराठे व माजगाव ग्रामपंचायत याना वर्षानुवर्षे पाणीटंचाई आहे,ती आतापर्यंतचे मुख्याधिकारी असताना नव्हती. त्यांच्याबाबतीत जराही विचार न करता शहरातील महत्वाचे मुद्दे बाजूला सोडून नको ते विषय घेऊन कोरोना सारख्या काळात प्रत्येकाला हैराण करणे म्हणजे तुम्ही स्वतःला बॉस समजता का???

आमच्या सावंतवाडी तालुक्याची संस्कृती शांत व संयमी आहे त्यामुळे लॉक डाऊन संपल्यानंतर आम्ही याबाबत गांधी मार्गाने विचार करू. तसेच कोरोना काळात तुमच्या कक्षेत असणाऱ्या सावंतवाडी शहरातील रुग्णालये व आरोग्याच्या बाबतीत तुम्ही किती वेळा बैठका लावल्यात, किंवा त्यांना एक मुख्याधिकारी म्हणून किती वेळा मार्गदर्शन केलात हे जाहीर करावे. तसेच सावंतवाडी शहरातील सर्वसामान्यांना सर्वात मोठा त्रास म्हणजे पाणीप्रश्न याबाबत वरिष्ठ कार्यालयापर्यंत किती प्रस्ताव पाठवलात हे सुद्धा आम्ही माहितीच्या अधिकारात उद्याच मागून घेणार आहोत, तुमची कर्तव्ये काय व तुम्ही करताय काय हे तुम्ही विसरलात. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे सोडा अन्यथा आपल्या विरोधात सावंतवाडीकर जनआंदोलन उभारतील असा इशारा मंगेश तळवणेकर यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा