समजत नाही कसा,
पकडतो हा कोरोना.
ओळख असली तरी,
होती अनोळखी भावना.
अस्पृश्य झालेत रुग्ण,
हरवत चालली माणुसकी.
म्हाताऱ्यासाठीही नाही,
शिल्लक राहिली आपुलकी.
स्वतःच्या आई बापाला,
परकी झालीत पोरं.
दुरावलीत नात्यांपासून,
वागताहेत जशी गुरढोरं.
औषध, प्राणवायू, बेड,
सगळ्यांचीच आहे कमी.
ईलाजापेक्षा रोग भारी,
तिथे प्राणाची नाही हमी.
प्राण जाता माणसाचा,
बेवारशा सारखे जाळतात.
कसाही मेला तरीही लोक,
कोरोनाचे नियम पाळतात.
हृदयावर दगड ठेऊन आप्त,
दुःख हृदयातच गाडून टाकतात.
मित्र,शेजार पाजार दुरूनच,
माणुसकीचे दर्शन दाखवतात.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.