शिक्षक परिषदेचा यशस्वी पाठपुरावा
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या परिक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा स्थगित झालेल्या असताना आता शिष्यवृत्ती परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. शिक्षक परिषदेने यासाठी शेवट पर्यंत केलेला पाठपुरावा कामी आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासाठी मंत्रालयात शिक्षक परिषदेतर्फे निवेदने व पत्रव्यवहार सुरू होता. शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी संयुक्त पत्र लिहून सतत पाठपुरावा सुरु ठेवण्यात आला होता. त्यानंतर शेवटी परीक्षा परिषदेची वेगवेगळी उत्तरे पाहून बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला होता. जो पर्यंत अधिकृत परिपत्रक येत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर याबाबतचा निर्णय लवकर होणे आवश्यक होते. कारण विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक अडकून पडले होते. सेंटर असणाऱ्या शाळा सतत संपर्क करत होत्या. तसेच ऑनलाईन शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू असणारे शिक्षक पालक सतत याबाबत विचारणा करत होते. त्यांच्या सततच्या मागणीमुळे शिक्षक परिषदेने हा विषय लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली गेल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.