राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव तथा माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सिंधुदुर्ग, मास्टर माईंड हेमंत उर्फ काका कुडाळकर यांचा आज वाढदिवस. काका कुडाळकर हे राजकारणातील मास्टर माईंड म्हणून ओळखले जातात. निवडणुकीत योग्य नियोजन करून लीलया निवडणुकीत यश मिळविण्यात त्यांचा हातखंडा. भाषेवर प्रभुत्व आणि राजकारणाची उत्तम जाण, उत्कृष्ट भाषणशैली यामुळे काका कुडाळकर हे कोणत्याही पक्षात असले तरी पक्षातील महत्वाचे नेते मानले जातात.
शिवसेना पक्षातून यशस्वी राजकारणी म्हणून नावारूपास आलेले काका कुडाळकर हे नारायण राणे यांचे खंदे समर्थक होते. बदलत्या राजकारणात नारायण राणे यांची साथ सोडत काका यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांच्या प्रतिभेला तिथे वाव न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत ते राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या महत्वाकांक्षी राजकीय कारकिर्दीत काका यांनी अनेक पदे भूषविली, सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या जिल्हापरिषद अध्यक्षपदी देखील ते कार्यरत होते. आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आजही काका कुडाळकर यांच्याकडे यशस्वी माजी जि. प. अध्यक्ष म्हणून पाहिले जाते.
हेमंत उर्फ काका कुडाळकर यांचा आज वाढदिवस. संवाद मिडियाकडून काका कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचालीस सदिच्छा.