You are currently viewing राज्यस्तरीय रोपस्किपिंग स्पर्धेत कासार्डेची कु. स्वप्नाली कदम अव्वल

राज्यस्तरीय रोपस्किपिंग स्पर्धेत कासार्डेची कु. स्वप्नाली कदम अव्वल

क्रीडा भारती कोल्हापूर आयोजित स्पर्धेचा निकाल जाहीर

तळेरे

क्रीडा भारती कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय आॅनलाईन रोपस्किपिंग स्पर्धेत कासार्डे साटमवाडी येथील कु. स्वप्नाली शिवदास कदम हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कु. स्वप्नाली कदम ही सध्या तळेरे येथील दळवी महाविद्यालयात मासमिडीयाच्या व्दितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
कासार्डे माध्यमिक विद्यालयात इ.७ वीत शिकण घेत असल्यापासून कु. स्वप्नाली कदम ही विद्यालयाचे क्रीडाशिक्षक तथा रोपस्किपींगचे राष्ट्रीय प्रशिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा रोपस्किपिंगचे सचिव दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली आजतागायत सराव करीत आहे.
कोल्हापूर क्रीडा भारती संघटनेच्या स्थापना दिन व हनुमान जयंती उत्साहाचे औचित्य साधून आयोजित या राज्यस्तरीय आॅनलाईन रोपस्किपिंग स्पर्धेला अनेक जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकांवर मात करून कु. स्वप्नाली कदम हिने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे.
संघटनेच्यावतीने तीला प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
तिचे कोल्हापूर क्रीडा भारती चे अध्यक्ष श्रीपाल जर्दे, जिल्हा मंत्री अश्विनी पाटील, शहरप्रमुख धनंजय पाटील व स्पर्धा प्रमुख दीपक क्षीरसागर, नरेंद्र कुपेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वप्निल च्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा