You are currently viewing द्रोणकाव्य

द्रोणकाव्य

निशब्द

मनातल्या भावना
डोळ्यांना कळती
मन नी डोळा
दोघांचेही
प्रेमच
आहे
ते

मनाला होई दुःख
ठेच काळजास
ओघळतील
गालावर
आसवं
नेत्र
ते

डोळ्यांना समजती
भाव हृदयीचे
नातेच त्यांचे
अंतरीचे
अतूट
आहे
ते

शब्द नकोत त्यांना
इशाराही मिळे
मर्म डोळ्यांचे
आपोआप
मनास
कळे
ते

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा