You are currently viewing पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट केल्या उपलब्ध

पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट केल्या उपलब्ध

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अँटीजेन टेस्ट किटचा तुटवडा निर्माण झाल्याने पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध केल्या आहेत. आज हे किट जिल्ह्यात प्राप्त झाले असून आरोग्य विभागाची गैरसोय दूर झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीकठिकाणी आरोग्य विभागामार्फत तपासणी केंद्रे सुरू केल्याने अँटीजेन टेस्ट द्वारे मोठया प्रमाणात कोविड चाचण्या करण्यात आल्या.त्यामुळे जिल्ह्यात अँटीजेन टेस्ट किटचा तुटवडा निर्माण झाला होता. अँटिजेन टेस्ट द्वारे तात्काळ कोविड रुग्ण जाणून येत असल्याने जिल्हा नियोजन निधीतून हे किट उपलब्ध करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना.उदय सामंत, व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज ओळखून ना.उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध केल्या असून त्या प्राप्त झाल्या आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा