You are currently viewing कामानिमित्त गोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास जबाबदार कोण?

कामानिमित्त गोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास जबाबदार कोण?

माजी.उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा सवाल

दोडामार्ग

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता दोडामार्ग तालुक्यात दिनांक ७ ते १५ मे पर्यंत कडक निर्बंध लादत लॉकडाउन करण्याचा निर्णय दोडामार्ग मधील प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला असून या निर्णयात पेट्रोल पंप,हॉस्पिटल, मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील, तसेच या निर्णयामुळे कामानिमित्त गोव्यात जाणाऱ्या कामगार वर्गावर या निर्णयाचा मोठा प्रभाव पडताना दिसणार आहे.
गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊन मध्ये गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या कामगार वर्गातील काही कामगारांच्या नोकऱ्या गेल्याने काही कामगार बेरोजगार झालेले असून पुन्हा एकदा कामगार वर्गाची गाडी सुरळीतपणे रेल पटरीवर येत असता दोडामार्ग ७ ते १५ मे पर्यंत करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊन मध्ये दोडामार्ग मधील कामगार वर्गास गोव्यात कामानिमित्त जात येत नसल्याने आणि त्यातच दोडामार्ग मधील बहुतांश कामगार वर्ग हा रोजगारा निमित्त गोवा राज्यावर अवलंबून असल्याने करण्यात आलेल्या कडक लॉकडाउन काळात गोव्यात जाणाऱ्या कामगार वर्गाच्या नोकर्‍या गेल्यास पूर्णपणे जबाबदार कामानिमित्त गोव्यात जाण्यासाठी रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील असा इशारा दोडामार्ग नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा