सिंधुदुुुुर्गनगरी
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचे नियम पाळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष राजन तेली म्हणाले की पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुडाचे राजकारण सुरू झाले असून ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांची खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानाला किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आग लावणे, त्यांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करणे अशा समाज विघातक लोकशाहीला मारक गोष्टी करत आहेत.
या लोकशाहीची हत्या करणारा या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने यापुढे देखील आंदोलने करतील. प्रशासनाचे प्रमुख या नात्याने आपण या भावना या प्रकरणाची दखल घेण्यास पात्र असलेल्या संबंधितास कळवाव्यात याबाबतचे निवेदन सादर केले. तसेच भाजपा पक्ष एवढा सक्षम आहे की ज्या कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहून त्यांना मानसिक व आवश्यकतेप्रमाणे आर्थिक बळ देतील असा आशावाद व्यक्त केला. सदर भेटीवेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, भाजपा सरचिटणीस प्रभाकर सावंत उपस्थित होते.