कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पळसंब गावात आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन ग्रामपंचायतमध्ये आरोग्य यंत्रणेचा व गावातील सद्य स्थितीचा आढावा घेतला. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप साळकर यांच्याशी चर्चा करत गावातील प्रत्येक नागरिकाची थर्मल स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्या. कोरोना साखळी तोडण्यासाठी गावातील जास्त जास्त नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यास त्यांनी सांगितले आहे.
कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये लक्षणे आढळल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. तसेच ऑक्सिजन तपासणीसाठी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे चार ऑक्सिमीटर देण्यात आले. नागरिकांच्या लसीकरणासाठी नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी पळसंबचे उपसरपंच सुहास सावंत,ग्रामसेवक युवराज चव्हाण, ग्रा. प. सदस्य अरुण माने, शिवसेना शाखाप्रमुख पिंट्या सावंत,राजेंद्रप्रसाद गाड,नारायण सावंत, प्रमोद सावंत, दादा सावंत, महेश वरक, तात्या पुजारे, गुरू परब आदी उपस्थित होते.